अजूनही चांदवा,
पोचतो अंगणी,
अंगणात चांदवा,
काळजात चांदणी.
लुकलुक डोळीयांत आजही अशी कशी,
हूरहूर भासते आजही अशी कशी !
पावले ओलावली,
भरती उधाणली,
उधाणली ओल ही,
पावलात सांडली.
हूळहूळ पावलांत आजही अशी कशी,
हूरहूर भासते आजही अशी कशी!
ओढता दार ती,
पळभर थांबली,
थांबल्या दारास मी,
चंद्रकोर टांगली,
सुनसून चांदरात आजही अशी कशी,
हूरहूर भासते आजही अशी कशी!
खुळावतो मेघही,
धरतीची आसही,
आसावल्या मेघाची,
तुझ्या मनी गाजही,
छुनछुन नादते आजही अशी कशी,
हूरहूर भासते आजही अशी कशी!
तशीच तू,
तसाच मी,
माझ्यात तू,
नाही तशी,
कुजबूज अंतरी आजही अशी कशी,
हूरहूर भासते आजही अशी कशी!
- प्रसाद साळुंखे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा