नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शनिवार, ९ जुलै, २०११

but what about next line???

विचारांची कारंजी उसळतात
शब्द शाई फासून स्वैर पळतात
प्रत्येक शब्दात जादू दडते
प्रत्येक ओळ चपखल पडते
पण काही तरी अडतं बुवा
बाकी असतं सगळं फाईन
श्या !! but what about next line???

अरे ये ना नेमक्या कुठल्या कुठल्या कोपर्‍यात शिरलायस?
मन डोकं खणून खणून दमलो अजून किती खोल रुतलायस?
आयला खरच असा अडून राहिलास तर मी पुरता थकून जाईन
हाड !! कागदाचे बोळे ... कपाळाला आट्या
god knows what about next line?

हो मघाशीच काहीतरी सुचलं होतं नेमकं तेव्हा फोन वाजला
अडलेला शब्दाची मिजास वाढली मग तो भलताच माजला
कानातोंडात अडकून पेन आता पाठ खाजवायला धावलं
पेनानेच पाठ दाखवली जेवढं लिहिलं तेवढं व्हावलं
आणखी किती वेळ हा आता असे नखरे दाखवत राहिल?
यार now what? nothing? then what about next line?

शब्द थोडे पुढे मागे घेऊन बघूयात काही जमतं का?
थोडासा ब्रेक घेऊन बघूयात वादळ थांबतं का?
घ्या पेनाचं टोपणही तुटावं?!! अजून किती वेळ जागा राहिन?
काय चाललंय काय? what about next line?

मिजासखोर अडून राहतात मग झोपायला उशिर होतो,
परिणामी रुमाल विसरतो,ट्रेन सुटते ..
आणि बॉसच्या बोलण्याने कान बधिर होतो
सुचला की मग कविता पुन्हा वाचाविशी वाटते
मनाच्या केबिनवर टकटक करून चक्क ऑफीसातही उभी ठाकते
ते डोळ्यातलं हसू, खुललेला चेहरा गैरसमज पसरवतात
लोकांचे कटाक्ष उगाचचं फुकटच्या पाकट लाजवतात
हे वेड जणू आता आयुष्यभर असंच छळत राहिलं
सारं एका प्रश्नापायी what about next line?

आहा!! शाब्बास बरा सापडलास, सुचलं बाबा पेन कुठंय?
कागदाचं चिटोरं? ते .. अ .. तिकडे? उडालं बहुतेक
रद्दी तपासली ..
वह्या चाळल्या ..
तात्पुरतं या औषधाच्या बिलावर लिहूयात,
बाकी कवितेचं चिटोरं काय आजउद्यात मिळून जाईलं
नाही मिळालं तर?
तर काय हाच प्रश्न कायम की what about next line?

-प्रसाद 
४ टिप्पण्या:

 1. tu baryach divasanni lihiles. Tari "what about next line?". tari chaan zamali ahe.
  :)

  उत्तर द्याहटवा
 2. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)
  बर्‍याच दिवसांनी प्रकाशित केलं असं म्हणूयात, लिहितो रोज अगदी पानांवर वगैरे जरी लिहिलं नाही तरी मनातली शाई काहीतरी रेघोट्या वेलांट्या मारत असते कळतनकळत

  उत्तर द्याहटवा
 3. फारच छान . व्हाट अबाउट द नेक्स्ट लाइन हा प्रश्न सरवानांच पडतो. विचार अगदी ठरवून ठेवल्या सारखे बिछान्यावर पडलं कि येतांत अम् त्या वेली हाताशी ना पेन ना कागद. सकाळी उठल्या वर सारं साफ.

  उत्तर द्याहटवा
 4. धन्यवाद आशाताई, अगदी खरयं अशा वेळेलाच सुचतं ज्यावेळी तुमच्या हाताशी काही नसतं, बरं नंतर आठवून लिहावं म्हटलं तर त्या ओळी धड लक्षातही राहत नाहीत :)

  उत्तर द्याहटवा