... मी येतो म्हणत डोळ्यासमोरून सुख गेलं निघून
निरोप देताना सुखाला मन आलं भरून
सुखाला म्हटलं जा सांभाळून जा नीट घरी
हसत रहा सुखात रहा निदान तू तरी
माझ्याबरोबर तू अगदी विसंगत वाटायचास
मी कारणाशिवाय चिंतातूर तू विनाकारण हसायचास
सुख सोबत असलं की आपली दुःख वाटतात मोठी
तरी सुखात आहोत अशी समजूत घालतो खोटी
तुझ्या सोबत असण्याने काही मनात सुख पाझरणार नाही
तुझ्या हसण्याने काही मी माझ्या दुःखाची कारणं विसणार नाही
काल तुला पायर्यांवर रडताना पाहिलं
हसणं कानात शिरलं नसेलही पण रडणं मला लागलं
थोडं विक्षिप्त आहे माझं वागणं
पण मला जगू दे माझं जगणं
तू हरलास मला सुखी ठेवायला असं समजू नकोस
खरं तर मीच हरवलेत असे बरेच क्षण माझ्या हातून
तू जा निघून कारण सुखी व्हायचंच नाहीए मला
मी रिचवत राहीन एकटा हा फसफसणारा प्याला
जा निघून नाहीतर उगाच गुंतत जाशील
धड सुखात नाही
धड दुःखात नाही
असा फसफसणारा प्याला बनून राहशील
-प्रसाद
Prasad,
उत्तर द्याहटवाkavita chan aahe..pan sarva thik aahe na re???
धन्यवाद अपर्णा,
उत्तर द्याहटवाझालं काळजीची वाळवी लागली तुझ्या डोक्याला,
सगळं ठीक आहे,
गटारी साजरी करतोय समज म्हणून तो 'फसफसणारा प्याला' :)
Chaan aahe Kavita...N I hope evrything is Ok...!!! :)
उत्तर द्याहटवाधन्यू मैथिली
उत्तर द्याहटवाहो हो सगळं कवितेइतकं ओके ओके आहे :)
खो दिलाय....खालची लिंक पहा...
उत्तर द्याहटवाhttp://majhiyamana.blogspot.com/2010/08/blog-post_07.html
प्रसाद मस्तच आहे रे कविता... प्रत्येक ओळीचा एक वेगळाच अर्थ लागतोय... मला खूप आवडली... :)
उत्तर द्याहटवाधन्यवाद रोहनजी :)
उत्तर द्याहटवा