नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

सोमवार, २६ जुलै, २०१०

पावसाळी गच्ची

काल माझ्या नविन कॅमेर्‍याचं नशिब फळफळलं, माझ्यासारख्या आळशाला चक्क दोन जिने चढून गच्चीत जाऊन कॅमेर्‍यासोबत प्रयोग करावेसे वाटले. अशी फेफरं मला अधेमधे येतात, बरच काहीबाही टिपण्याचा प्रयत्न केला, फोटोग्राफीची विशेष माहिती नाही पण क्लिकायला मस्त वाटतं. जास्त बोलत नाही तुम्ही ही फोटोग्राफी (उप)भोगा

नव्या नव्या छपरावरचं कोवळं शेवाळ तुकडा दिसतं


हे कोणाचं बरं बालपण उन्हापावसाचं गच्चीत गंजत पडलय?


ऐटदार


कसलेही फोटो काढतंय कार्टं, वर म्हणे याला म्हणतात आर्ट


ही शिडी थेट पावसाच्या पोटात जाते

टेक्शर मस्त आहे ना?

कच्चा कोपरा

बांबूचे घर, बांबूचे दार


हुप्पे


हिरवा कठडा


टाइस्लच कोलाज
खोळंबलेलं बांधकाम

जब प्यार किया तो डरना क्या


घन ओथंबून आले

शेजारची इमारत, वर गच्च आभाळ आणि आजूबाजूला गच्च गच्च्या, पावसाळी

६ टिप्पण्या:

 1. नमस्कार 'अनाकलनीय'
  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यू मैथिली,
  जरा पुन्हा नीट सांगशील का कुठले फोटो आवडले ते?
  थोडं वर्णन करुन सांग, म्हणजे फुलांचा, ढगांचा किंवा शिडीचा असं,
  त्याचं काय आहे माझं गणित कच्चं आहे थोडं
  प्रतिक्रियेबद्दल पुन्यांदा धन्यू :)

  उत्तर द्याहटवा
 3. Arre...cycle chya chakacha, Building ch aani Tagarichya phulanche photos aawadale mala... :)

  उत्तर द्याहटवा
 4. धन्यवाद मैथिली हुरुप वाढला, आता पुढच्यावेळी तुला जास्त फोटो आवडलेले असतील बघ :)

  उत्तर द्याहटवा