सूर्य माझा पाठलाग करतोय कधीचा
भांग विस्कटलाय, चेहरा रापलाय
पाठीला स्पर्श जाणवतोय ओघळणार्या घामाचा,
त्यांनी दिलय कधीही पूर्ण न होणारं टारगेट
आव्हान नावाचं झगझगीत लेबल लावलय त्याला
रोजीरोटी टिकवायचाच वैताग आहे साला
महिना अखेरीला पगार हवाय आव्हान पूर्ण करा
बॉसच्या तावडीतून सुटायचय आव्हान पूर्ण करा
मॅनेजर व्हायचय आव्हान पूर्ण करा
विदेशात जायचय आव्हान पूर्ण करा
अगदी श्वास घ्यायचा असेल तरी आधी आव्हान पूर्ण करा
टारगेट अचिव्ह केल्याशिवाय मरायचीही उसंत नाही
हार्बर-वेस्टर्न-सेंट्रल फिरतोय दिशा दाही
आज मोजमाप झालं सार्यांचं
घामाच्या .. अश्रूच्या प्रत्येक थेंबाचं, आणि लोकलच्या वार्यांचं
मर मर मरून टारगेट पूर्ण होता होता राहिलं
प्रत्येकाने मिळेल त्यामध्येच स्वत:चं हित पाहिलं
सहनशक्ति संपल्यावर थोडा आवाज चढा झाला
भुवया उंचावल्या, ओठ थरथरले आणि मोठ्ठा राडा झाला
आमच्या टारगेट मधून बॉसही त्याच्या नावावर काहीतरी खपवतो
साला आम्ही फुकट झक मारतो नि रक्त आटवतो
तरीही त्यांना हवी होती प्रत्येक मान खाली
माझी मात्र चीड बोलण्यातनं व्यक्त झाली
काम साधून झाल्यावर सगळ्यांदेखत लाथाडलं
नोकरी गेली वर क्रेडिटही ओरबाडलं
म्हणून इथे बसलो येऊन
हातात थंड बियर आणि डोळ्यात जळते निखारे घेऊन
एक सीप . . .
इथे कठड्यावर जाणवतोय फणफणारा वारा
कित्येक दिवसात असा निवांत बसलोच नाही
सतत कसलं तरी टेन्शन, सतत कुठे तरी पोहोचायची घाई
एक सीप
अजून दारु पिताना आठवतो आईने देवाजवळ लावलेला दिवा
अगरबत्त्यांची उद, आणि धूर
तोच धूर दिसतोय आता, .. इथे?
आता डोळे भरून रडावंसं वाटतंय ..
एक सीप
नोकरी लागली तेव्हा उड्या मारलेल्या आनंदात
त्या उड्यांचंच कर्ज झालंय जणू
नोकरी गेलेल्याकडून कर्ज फेडण्याची आशा?
एका उडीत फिटेल कर्ज आयुष्यभरचं ..
एक सीप
आईचा निरांजनाने उजळलेला चेहरा,
बाबांची आरामखूर्ची,
ताईचे कानातले, टिकल्या ..
एक सीप
केरसुणी, किचनमधले पितळेचे तीन डबे
माळ्यावरची धुळीत पडलेली बॅट
कपाटावरची फुलांची नक्षी
मोराचा पडदा ..
एक सीप
कुंडीतली सदाफुली,
घरामागचा पारिजात
मोडकी सायकल
सगळं डोळ्यासमोरून गेलं ..
आवडीच्या काही जागा, काही माणसं, काही घटना आठवून पाहिल्या
आयुष्याला काही भाग मुद्दाम वगळला या द्श्यपटलातून ..
शेवटचा जळजळीत सीप
टिन भिरकावला
कठड्यावर उभा राहिलो
काही सेकंदांसाठी गरुडाचं बळ जाणवलं पडलेल्या खांद्यांना
पण आता पूर्वीसारखी आकाशाची ओढ नव्हती
उलट समोरची खोल दरी जवळची वाटत होती
आता फक्त दरीतल्या थंड काळोखात निजायचं होतं शांतपणे
आज समजलं
आयुष्य नावाचं आव्हान संपलं ...
-प्रसाद
खूप चांगलं लिहिलंय
उत्तर द्याहटवाधन्यवाद अनघा :)
उत्तर द्याहटवाचुरापावच्या गाडीवर येत रहा
Hi Prasad, I became tipsy with your "SYP".Great yaar.
उत्तर द्याहटवाधन्यवाद अरुण,
उत्तर द्याहटवाTipsy!!! सही आहे, पण चकणा म्हणून फक्त आणि फक्त चुरापाव हा :)
मस्तच भाई!
उत्तर द्याहटवाआवडलं ! मनातल्या व्यथा सुंदर मांडल्यास!
फक्त शेवट्ल्या ओळींबद्दल सांगतो..
वेगवेगळ्या व्यथांना बीअरच्या एका एका सीप बरोबर घोटून घ्यायचं..आणि कितीही काहे झालं तरी दरीत झोकून आयुष्याचं आव्हान संपवू नये.
उलट दुसरी बीअर घ्यावी आणि नविन आव्हानं कशी पार पाडायची याच्या तयारीला लागावं...
बाकी नेहमीप्रमाणेच सुंदर शब्द!!
धन्यवाद दिपक,
उत्तर द्याहटवाहो यार हा कवितेचा नायक थोडा जास्त हळवा आहे :)
Visited your blog for the first time. May I shake hand with you?
उत्तर द्याहटवा:)
@ हर्षदा
उत्तर द्याहटवाचुरापावच्या गाडीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद येत चला अधूनमधून,
हा चालेल शेकूयात की