नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०१०

'खो'च्या आयचा घो

सर्वप्रथम अपर्णाने दिलेला खो मी गांभीर्याने घेतल्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो (मला हायपर लिंकही जमतं, पण कशाला उगाच एखाद्याचे हिट्स वाढवा.) कुठला खो? अहो तो नाही का इ.स.पू.1245 साली दिलेला, हसू नका तारखेचे पुरावे आहेत माझ्याकडे. त्यांना पुरा इकडे बघा काय तोडलेत आम्ही.

भाषांतराचा हा खो म्हणजे माझ्या ब्लॉगची गोगलगाय दौड रोखायचा एक कट होता (आरोपी अपर्णा हाजीर हो) माझ्या भाषांतराची कुर्‍हाड कोणत्या दुर्दैवी कविवर कोसळतेय याची मलाही उत्सुकता होती. पण सगळे सुखरूप आहेत. तरी एक कविता कचाट्यात सापडलीच. ही जॉनी जॉनी लहानपनी तुमच्यातल्या बर्‍याच कोनी कोनी ऐकली असेलच? म्हणूनच मुद्दाम मूळ कविता मी पोस्ट करत नाही.

लहानपणी जॉनी जॉनी ऐकताना वाटायचं यांचा बाप जाम शॉलेट हाये. खोड्या पचवायची सहनशक्ती हल्लीच्या पालकांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त दिसते. असो तर ही कविता आपल्याइथे काही घरांत कशी झाली असती ते मांडायचा मी प्रयत्न केलाय. आता पुरेशा प्रमाणात बडबड झालेली आहे, पण थांबा इतक्यात जांभई देऊ नका भाषांतर संपायला अवकाश आहे राखून ठेवा शेवटच्या कडव्यापर्यंत.


मराठी जॉनी जॉनी:
गणू गणू


गणू गणू
हो बाबा

साखर खाल्लीस?
नाय बाबा

खोटं बोलतोस?
नाय बाबा

उघड पाहू तोंड
आ आ आ
गधड्या शिंच्या रांडेच्या या वयात ही थेरं
.... (बाबा गणूचं मारून मारून गोणपाट करतात)

गणू !! गणू?
ऊं बाबा

... सुजलास का रे?
उ .. उ .. ब .. भ्म्हाSSSSSSSSSSSSSSऽ :(

- साद

१२ टिप्पण्या:

  1. आरोपी हाजीर है जजसाब !!!
    इतके दिवस मार खात होतास म्हणून वेळ लागला अस वाटतंय अनुवाद करायला...आता दिवाळी आली हा गण्या. खा पाहिजे तितकी साखर...............
    मस्त झालाय रे अनुवाद...असे काही आणखी कर न आरुषसाठी...:) आणि हो मुख्य खो जुना झाला तरी तुला कुणी नव बकरा/बकरी गाठायला हरकत नाही यार...

    उत्तर द्याहटवा
  2. प्रसाद... तू काहीतरी लिहिलेस तरी. देवेंद्र ने दिलेला खो मी अजून पूर्ण केलेला नाही.... :D

    अरे आहेस कुठे तू??? मध्ये आम्ही अजून एका ट्रेकला जाऊन आलो... तुझा काहीच संपर्क नाही... :(

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद मैथिली एकदम केश्तो सारखी हसलीस हीहीहॅ :)

    उत्तर द्याहटवा
  4. नमस्कार अपर्णा,
    आरुषसाठी? काय बोलायला लागल्याबरोबर शिव्यांचं ट्रेनिंग द्यायचं का? स्वीट स्वीट आरुषसाठी नुसती साखरच साखर नो रट्टे नो रट्ट्यांची भिती आणि नो रट्ट्यांची कविता (त्याला कंदिल शिकव ग)
    आम्ही असल्या 'खो' द्यायच्या 'खो'ड्या करत नाही :) न जाणो पुन्हा त्या बकरा / बकरीने बदला म्हणून कुठलातरी ठेवणीतला 'खो' फेकून मारला तर?
    प्रतिक्रियेसाठी धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  5. नमस्कार रोहन,

    काहीतरी लिहायचं म्हणून लिहिलं मला कॉलेजच्या परीक्षांची आठवण झाली :)

    अरे इथेच आहे मी ... घर, ऑफिस आणि ट्रेन बस्स ...
    हा अरे तो याहूवरचा दुसर्‍या ट्रेकचा मेल मी फार उशिरा बघितला, आता डिसेंबरात बर्‍यापैकी वेळ असेल मला सुट्टीही संपवायचा विचार आहे
    खो लवकर पूर्ण कर तुझ्या अनुवादाकडे सगळे डोळे लावून बसलेत :)
    प्रतिक्रियेसाठी धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  6. नमस्कार गौरी,
    हो मी बघितलय मित्रांना त्यांच्या तीर्थरुपांनी शिस्तीच्या नावाखाली तुडवताना, याच भितीपोटी मूलं गोष्टी लपवायला सुरुवात करतात, फार हळवी होतात कोमेजून राहतात किंवा कधी कधी कमालीची चिडचिडी होतात
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  7. लय भारी झाला आहे, खो च्या आयच घो...मस्तच... :)

    उत्तर द्याहटवा