नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

बुधवार, १० जून, २००९

खेळ मांडियेला

निळी शाई कोरा कागद, आम्ही कोणाला भीत नाही
एवढं म्हणण्याइतकेसुद्धा, आम्ही साले धीट नाही

रंगात रंग कोणता? खेळू लागले सारेजण
ताठ मानेनं फडफडणारी, एकरंगी फीत नाही

लपंडावात कसे सारे एकजात पारंगत
पिढ्यानपिढ्या खेळूनदेखील, खेळाचा त्या वीट नाही

सोनसाखळीने बघताबघता घेराव की हो घातला
जनता बापडी यात, चारी मुंड्या चित राही

कांदाफोडी तर पठ्ठे असे काही खेळतात
जणू कुठल्याच पक्षाशी, आता उरली प्रीत नाही

सिनेमावाले मांड्या थोपटीत हुतुतूत आले
तशी सिनेमावाल्यांना पाडायची, आपल्याकडे रीत नाही

खेळाचे नियम पाळा की राव
खेळाचं मैदान आहे, तुमचं पिलभीत नाही

लाईचना खात बसले, आम्हाला साधी ट्रीट नाही
जा काका आता, तुमालाबी सीट नाही

सामान्यांना राजकारणात वाव नाही
कारण दुधात पीठ मिसळायची, त्यांच्याकडे ट्रीक नाही



-प्रसाद 

४ टिप्पण्या:

  1. धन्यवाद, काही सुधारणा असल्यास जरुर सांगा, मला आवडेल, मला कवितेतल्या खाचाखोचा शिकायची इच्छा आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. रंगात रंग कोणता? खेळू लागले सारेजण ... ताठ मानेनं फडफडणारी, एकरंगी फीत नाही ...

    हे कडवे जाम आवडले. लहानपणी 'लाल बटाटा रंग कोणता' खेळायचो ... आता रंगांचे अर्थच बदलले... :)

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद रोहनजी

    हो खरंय रंगांचे अर्थच बदललेत हल्ली

    उत्तर द्याहटवा