कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके
घर असे हे पडके
जणू घर नाही आता आहे ओले हे थडगे
घरी असा एकटा मी
म्हातारा कुचकामी
पुत्रदर्शन दुर्मिळ
सणावारी कधीकाळी तो दारी या धडके
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके
चार पैसे धाडी मला
ठेवाया नोकरगडी घरा
दोन बोटे पत्र नाही
बाळा संपली का शाई?
असे कसे मन ह्याचे झाले कठोर कोडगे
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके
लोक हसती मला
उगाच उपहास
हा औषधांचा मारा
पथ्य आणि उपवास
वर अंगावर नाही धुपे सुके फडके
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके
आता येऊ दे पूर
संपू दे किरकिर
कुणी मारेल खांदा
कुणी धरेल मडके
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके
-प्रसाद
वर छप्पर गळके
घर असे हे पडके
जणू घर नाही आता आहे ओले हे थडगे
घरी असा एकटा मी
म्हातारा कुचकामी
पुत्रदर्शन दुर्मिळ
सणावारी कधीकाळी तो दारी या धडके
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके
चार पैसे धाडी मला
ठेवाया नोकरगडी घरा
दोन बोटे पत्र नाही
बाळा संपली का शाई?
असे कसे मन ह्याचे झाले कठोर कोडगे
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके
लोक हसती मला
उगाच उपहास
हा औषधांचा मारा
पथ्य आणि उपवास
वर अंगावर नाही धुपे सुके फडके
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके
आता येऊ दे पूर
संपू दे किरकिर
कुणी मारेल खांदा
कुणी धरेल मडके
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके
-प्रसाद
chhan :)
उत्तर द्याहटवाछान :)
उत्तर द्याहटवाअहो एवढी त्या बिचार्या म्हातार्याची व्यथा मांडलीय मी, करूण रसातली कविता आहे आणि आपण चक्क हसता आहात?
असो मस्करीचा भाग सोडूयात ... फारसं मनावर घेऊ नका
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद :) :) :)
khoopach karun aahe.
उत्तर द्याहटवाधन्यवाद :)
उत्तर द्याहटवा