नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

रविवार, ३ जुलै, २०११

उडती बातें ...



माझ्याबद्दल दोन चार वाईटसाईट गोष्टी ऑफिसातल्या मित्राने (?) सांगितल्या तेव्हाचा संवाद -
"अच्छा? कौन बोला? मतलब तुम्हे कैसे पता चला?"
"नही .. ऐसेही उडतेउडते"
"देखो भैया हवा मे कई सारी बाते होती है, अब जो बात खुदके बलबुतेपे उड भी नही पाती, उडनेके लिए भी जिसे हवा का सहारा लेना पडता है भला उस बात को हम तवज्जू क्यो दे? चायसिगरेट के साथ लोग कई बाते करते है .. वही हवा मै .. उडतीउडती बातें .. देख कल एक और आंधी आएगी, बातों के पत्ते बिखर जाऐंगे, फीर बातें बातें रहे जाएंगी और आदमी आदमी"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा