नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

बुधवार, २५ नोव्हेंबर, २००९

चंद्र आहे साक्षीला

मला खिडकीतून दिसणारा चंद्र, आणि वडिलांच्या मोबाईल मधला जेमतेम 2 mp चा कॅमेरा, स्वस्थ घरी बसावं तरी कसं? तडक मोबाईल घेऊन गच्चीत गेलो, जमतील तसे आणि जमतील तितके फोटो काढले. गच्ची गुडुप काळोखी, चिटपाखरुदेखील नसलेली, माझ्या वेडाचा साक्षीदार तो दूर आभाळातला एकटा चंद्र, सध्या माझ्या संगणकात बंदिस्त.
लपायला निंबोणीचंच झाड हवं असं काही नाहीतोच चंद्रमा नभात
श्वासात चांदणे भरायचे
हे शहर कधी झोपतं का?हा चंद्र तुझ्यासाठी ...पुसटशी गझल दुरुन ऐकू येणारी .. गडद रात्र .. आणि ओळखीचा चंद्रचंद्रावर जीवसृष्टी आहे का नाही माहीत नाही पण चंद्रामुळे सृष्टीत जीव आहे एवढं मात्र खरंरातकिडे (रात्री केलेले किडे)झूम केनशाहसरे दिवेनाकीनऊकृत्रिम चंद्रउद्या याच वेळी डन डन डन२ टिप्पण्या:

  1. धन्यवाद, लहानपणापासून मी उद्योगीच आहे, तुमच्या शब्दांनी प्रोत्साहन मिळालं, आता अधिक जोमाने नवनवीन उद्योग करीन :)

    उत्तर द्याहटवा