ऑफिसातनं घरी येऊन मी पेपर चाळत बसलो. तेव्हा खूप वर्षांनी एक ओळखीचा चेहरा दिसला, म्हणून खूप उत्साहात बातमी वाचायला घेतली पण सारा उत्साहच मावळला. गॅरी कोलमनचं 26 मे च्या बुधवारी घरात पडण्याचं निमित्त होऊन निधन झाल्याची ती बातमी होती. हा गॅरी कोलमन आणि माझं नातं तसं जूनं. लहानपणी त्याची 'डिफरण्ट स्ट्रोक्स' नावाची मालिका मी न चुकता पहायचो. त्यातला ठेंगणासा, गोबर्या गालांचा, कुतूहलमिश्रित डोळे घेऊन वावरणारा व्दाड आणि उत्साही अर्नाल्ड नावाचा चिमुकला मला टिव्हीसमोर खिळवून ठेवायचा. हा अर्नाल्ड म्हणजेच गॅरी कोलमन. त्याच्या उत्स्फूर्त अभिनयाने आम्हा सार्यांना ताजतवानं करायचा. मी पाहिलेलं 'डिफरण्ट स्ट्रोक्स' ही हिंदीमध्ये भाषांतरीत केलेली मालिका होती. मूळ मालिका माझ्या जन्माच्याही अगोदर अमेरिकेत प्रदर्शित झालेली. तरी ही मालिका बघताना काही वेगळं बघतोय असं जाणवायचं नाही. हे विदेशातलं 'जाम भारी' वगैरे आहे असं वाटायचं नाही. गॅरी कोलमन आमच्यापैकीच वाटायचा, अगदी आमच्या शाळेतल्या वर्गातल्या बाकाबाकावर बसणार्या मूलांइतका आपल्यातला. अमेरिकेतल्या तुफान लोकप्रिय असलेल्या मालिकेचा तो स्टार आहे हे फार मागाहून कळलं.

या नात्यातही घटस्फोट होता होता राहिला. हे आणि असे त्याच्या जीवनाचे अनेक पैलू बातमी वाचता वाचता समोर आले.
माझ्या मावसभावाला घड्याळ कळायचं नाही, एकदा त्याला मी विचारलं मग शाळेत किती वाजता जातोस, त्याने उत्तर दिलं "ती काळ्या मूलाची सिरियल संपली की म मी तयारी करतो" इतका हा पठ्ठ्या आमच्यासारख्या बच्चेकंपनीच्या दिनचर्येचा भाग झालेला.
बातमीबरोबरचा जवळपास पासपोर्ट साईजचा तो फोटो, आणि त्या चेहर्याचे भाव मला त्या अवस्थेतही ताजतवानं करून गेले. मित्रा जिकडे असशील तिकडे नक्कीच आनंदात असशील. हास्याची कारंजी उडवत असशील. तुला विसरणं शक्य नाही.

फोटो जालावरून साभार.