पमा - पहिला माणूस आणि दुमा - दुसरा माणूस यांच्यातला एक काल्पनिक संवाद
रविवार दुपार.
बोंबिल, जौला, मांदेलीचं सार भात खाऊन कोचावर बडिशेप चघळत झोपायच्या तयारीत पमा. तेवढ्यात फोन वाजतो. रिंग रॉंग रिंग रॉंग (रॉंग नंबरची रिंग अशी वाजते)
आळसावलेल्या अंगाने पमा फोन उचलतो.
पमा - हॅलो (ऐकणार्याला हॅलो ऐकल्याक्षणीच जांभई यावी असा हॅलो)
दुमा - हॅलो (विरुद्ध टोकाचा उत्साही हॅलो)
पमा - हॅलो (काही न सुचल्यामुळे म्हटलेलं हॅलो)
दुमा - हॅलो? (पहिला हॅलो ऐकू गेला नसेल किंव मघाचचा पलिकडून आलेला हॅलो हा भास असावा असं समजून केलेला, थोडक्यात confused hello)
पमा - हा हा हॅलो पुढे बोला (त्रासिक आवाजात)
दुमा - करपे आहेत का?
पमा - कुठला नंबर हवाय?
दुमा - नंबर नकोय करपे हवेत.
पमा - इथे करपे राहत नाही
दुमा - म्हणजे?
पमा - काय म्हणजे? मराठी कळत नाही का? करपे नय हय घरपे
दुमा - मी त्यांचा मित्र बोलतोय घाटकोपरहून ... ते अं पेस्ट कंट्रोलचं थोडं काम होतं ... त्यांनीच नंबर दिलाय, केर ऑफ नंबर दिलाय .. तर तुम्ही करपेंना बोलवाल का प्लीज?
पमा - अरे कोण करपे? (चढलेल्या आवाजात, प्लीजचा उपयोग शून्य)
दुमा - सदानंद करपे शिडशीडीत काळसावळेशे आहेत
पमा - तुम्ही कुठला नंबर फिरवलाय?
दुमा - मी मोबाईलवरून बोलतोय.
पमा - नाही नाही नंबर कुठला फिरवलात विचारलं?
दुमा - अहो तेच सांगतोय मोबाईलवर नंबर फिरवतात की दाबतात?
पमा - बरं कुठला नंबर दाबून माझं फिरवताय
दुमा - काय?
पमा - अरे नंबर कुठला दाबलास (आवाज शेवटला फाटतो सूफी गायकांसारखा)
दुमा - तुम्हाला तुमचा नंबर नाही माहिती मोबाईल एक दहा आकडी असतो, घरचा तरी पाठ हवा .. (शांतता) हॅलो?
पमा - झालं तुमचं? तुम्ही कुठला नंबर फिरव.. दाबलात ते सांगा मग मी तो चूकीचा की बरोबर ते सांगेन
दुमा - अरे वा नंबर चूकीचा म्हणणारे तुम्ही कोण? आणि करप्यांसारखा देव माणूस चूकीचा नंबर देईलच का?
पमा - अरे चू ..
दुमा - ओ
पमा - अरे चूक नंबर लिहून घेतांनाही होऊ शकते चूकीचं ऐकून, अपूर्ण ऐकून? आता केलंत तसं?
दुमा - पण त्यांनी कगदावर लिहून दिलाय
पमा - तुम्ही आणि करपे काय ते बघून घ्या, मी फोन ठेवतोय (वैतागून पमा फोन आपटतो)
(दुसर्या मिनिटाला परत फोन वाजतो)
पमा - हॅलो
दुमा - हॅलो
पमा - हं बोला
दुमा - सदानंद करप्यांशी थोडं ...
पमा - (दुमाचं वाक्य मध्येच कापत) अहो परत तुम्ही मलाच फोन केलात
दुमा - मी काय हौसेनं फोन करायला वर्गमैत्रिण आहे का तुमची? मला दिला तोच लावतोय माझी काय चूक?
पमा - मग माझी तरी काय चूक? कोण कुठला तो सदानंद करपे का ढरपे ..
दुमा - नाही नाही ढरपे नाही करपेच
पमा - कोणी का असेना तो तिकडे दुपारचा छान तंगड्या पसरुन झोपला असेल, आणि फुकटचा आम्हाला त्रास
दुमा - एवढे का वैतागताहात इनकमिंगला पैसे नसतात ना?
पमा - म्हणूनच फुकटचा त्रास म्हणालो ना? करपे इकडे नाहीत कळलय??? पक्क करून घ्या .. हा नंबर फिरवायचा
दुमा - मोबाईल आहे
पमा - दाबायचा नाही
दुमा - हॅलोहॅलोहॅलो ... हॅलो?
पमा - बोला (कंटाळवाण्या स्वरात)
दुमा - जरा नंबर तपासूयात का? दोन सात सहा
पमा - दोन सात सहा हा पुढे बोला
दुमा - दोन सात सहा दिड
पमा - दिड?
दुमा - दिड लीटर आहे, तीन पिशव्या फ्रिजमध्ये आहेत, नको आणूस अजिबात .. हॅलो सॉरी हं जरा .. हा दोन सात सहा तीन पाच दोन
पमा - पुढे?
दुमा - नकोय लवकर ये .. हा सॉरी बोला
पमा - नंबर सांगत होतात, पुढे सांगा
दुमा - कुठे होतो?
पमा - शेवटी दोन .. दोनच्या पुढे?
दुमा - दोनच्या पुढे सात, सातच्या पुढे सहा, सहानंतर पाच, पाच? नाही नाही पाच कसं असेल? पाच तीन नंतर आहे, त्याआधी सहानंतर तीन आहे.
पमा - अहो अहो दोन सात सहा तीन पाच दोन सात सहा तीन एवढा मोठा नंबर?
दुमा - माफ करा पुन्हा सांगू का? दोनच्या पुढे सात, त्याच्यानंतर सहा, सहानंतर पाच
पमा - राहूदेत
दुमा - राहूदेत कसं? दोनशे शहात्तर
पमा - तुम्ही शांत रहाल का प्लीज? मी माझा नंबर विसरेन
दुमा - तात्पुरता लिहून ठेवा बाजूला मग निवांत तपासून सांगा, मी करतो हवं तर पाच मिनिटांनी
पमा - तेवढं करू नका काय ते आत्ताच मिटवा .. तुम्ही असं का नाही करत?
दुमा - कसं?
पमा - करप्यांना उद्या भेटून पुन्हा नंबर घ्या?
दुमा - शक्य नाही, त्यांनी पेस्टकंट्रोलच्या कामासाठी सुट्टी घेतलीय, आज अक्चूली मी घर पहाणार होतो
पमा - मग पत्ता असेल ना तुमच्याजवळ?
दुमा - पत्ता आहेच ओ पण वेळ हवा ना?
पमा - म्हणजे घर पहायला वेळ नाहीये का तुम्हाला?
दुमा - नाही वेळ आहे पण दुपारचं असं लोकाच्या घरी जाणं प्रशस्त वाटतं नाही ना? तेवढी त्यांच्या सोईची वेळ विचारली असती फोन करून
पमा - केवढी काळजी
दुमा - नाही ओ नोकरदार माणसं, रविवरची एक सुट्टी, त्यात नेमकं दुपारचं आपण जा बरोबर वाटत नाही ना?
पमा - मग तिच काळजी थोडी आमच्याही बाबतीतही दाखवलीत तर
दुमा - मी काय आमंत्रणं धाडली होती का माझ्याशी बोला म्हणून?
पमा - एक मिनिट .. फोन तुम्हीच केला होतात
दुमा - मग उचललात का?
पमा - उचललात का म्हणजे? वाजू द्यायचा होता का? माझा फोन मी तो उचलेन, आपटेन, फिरवेन, दाबेन, जाळेन, बुडवेन काहीही करेन तुला काय करायचय त्याच्याशी?
दुमा - ही तुमची बोलायची पद्धत
पमा - रॉंग नंबरशी बोलायची पद्धतच नाहीये आमच्यात, एवढं बोललो ते नशिब समजा
दुमा - करप्यांना भेटून मी सांगणार आहे, चूकीचे नंबर देता तर निदान सुसंस्कृत आणि सुशिक्षित चूकीच्या माणसांचे नंबर देत चला
पमा - तेही चूकीचेच मागा, तुम्हाला बरोबर नंबर कोणी मागूनही देत नाही का? करप्याचा नंबर मिळाला तर आधी मला दे साल्याला रविवारी अडीज-तीनलाच फोन करतो.
दुमा - तुम्हीही पेस्ट कंट्रोलवाले?
पमा - असतो तर माझ्या डोक्याचं आधी केलं असतं, निदान माझ्या डोक्याला अशा मुंग्या आल्या नसत्या, ठेवा आता फोन (पमा फोन आपटतो)
संध्याकाळच्या सुमारास पमाचा फोन पुन्हा खणखणतो रिंग रॉंग रिंग रॉंग रिंग रॉंग रिंग रॉंग
पमा - हॅलो
दुमा - मी जाधव
पमा - कोण जाधव का? हा हा जाधव ... अं .. कोण जाधव?
दुमा - मघाशी दुपारी फोन केलेला?
पमा - करप्यांचा जाधव? अहो करपे नाहीयेत इकडे तुम्ही का अंत पहाताय?
दुमा - नीच माणूस
पमा - काय?
दुमा - करपे एकदम नीच माणूस, रेट काढला आणि काम दुसर्याला दिलं, झालेला व्यवहार ..
पमा - नंबर मिळाला म्हणजे बरोबर?
दुमा - नाही घरीच गेलो त्याच्या, काम चालू होतं पाहिलं डोळ्यांनी, हे परप्रांतीय लोक ..
पमा - इथे फोन करण्याचं प्रयोजन?
दुमा - नाही जरा त्रास दिल्याबद्दल
पमा - असू दे चालायचच
दुमा - सॉरीबिरी अजिबात म्हणणार नाही नंबर चूकीचा दिला त्यात माझी काय चूक? तुम्ही ते मुंग्यांचं काहीतरी बोलत होतात?
पमा - डोक्याच्या मुंग्यांचं ते त्रास, वैताग अशा अर्थी
दुमा - डोक्यात मुंग्या? काहीतरीच काय उवा असतील?
पमा - तुम्हाला कधी रॉंग नंबर आलाय का ओ?
दुमा - नाही
पमा - तुमचा नंबर द्या मला, मी रेल्वेच्या डब्यात ज्यूली, स्वीटी खाली तुमचा नंबर लिहून रॉंग नंबरची सोय करेन, मग तुम्ही ठरवा डोक्याला येतात त्या मुंग्या का उवा ते? Useless (फोन आपटतो)

हा हा हा.. एकदम जबऱ्या झालंय.. पमादुमा :-)
उत्तर द्याहटवाहाहा...... धमाल झालीये रे. शेवटचा डायलॊग मस्त. :)
उत्तर द्याहटवानमस्कार हेरंब,
उत्तर द्याहटवाप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद :)
नमस्कार मॅम,
उत्तर द्याहटवाअरे बापरे, शेवटपर्यंत वाचलात तुम्ही? कमाल आहे, मला ते लिहून झाल्यावर पुन्हा वाचताना जांभया येत होत्या हा हा हा:)
धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल :)
रिंग रॉंग रिंग रॉंग (रॉंग नंबरची रिंग ..... )हा हा हा.....
उत्तर द्याहटवाएकदम धमाल ..............:)
नमस्कार अपर्णा,
उत्तर द्याहटवा'रिंग रॉंग रिंग रॉंग' खरच अशी रिंग वाजते तर काय हवं होतं?
या रॉंग नंबरच्या कटकटीपासून सुटका झाली असती :)
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)
चूऱ्या.. बरेच दिवसांनी लिखाण केलेस रे ... ज़रा लिहीत जाकी जास्त असे हसकुले... चुटकुले... मज्जा आली जाम वाचताना.. इकडे ऑफिस डेस्कवर एकटाच हसत होतो वाचता वाचता. बाकी सर्व फिरंगी कोणाला मराठी काय येइल... !!!
उत्तर द्याहटवापमा - दिड?
दुमा - दिड लीटर आहे, तीन पिशव्या फ्रिजमध्ये आहेत,
आणि
मी मोबाईलवरून बोलतोय.
पमा - नाही नाही नंबर कुठला फिरवलात विचारलं?
दुमा - अहो तेच सांगतोय मोबाईलवर नंबर फिरवतात की दाबतात?
पमा - बरं कुठला नंबर दाबून माझं फिरवताय...
भारीच आवडले ... हेहे !!!
नमस्कार रोहनजी :)
उत्तर द्याहटवाहो बर्याच दिवसांनी लिहिलय, चांगलं काही सुचतच नाही, पण मग चुरापाव थंड होईल या भितीने असं काहीतरी लिहितो,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)
Bharri...... Altimate....
उत्तर द्याहटवाPama, Duma..., Ring rong ( wrong no chi ring) Mastach...... Jaam aavadale...!!!!
धन्यवाद मैथिली :)
उत्तर द्याहटवाहे हे हे :)
उत्तर द्याहटवाधम्माल चुरा झालाय!
हसून हसून लोळतोय,,,
मज्जा मज्जा!! :)
धन्यवाद दिपक,
उत्तर द्याहटवामज्जा मज्जा आली प्रतिक्रिया वाचून :)
सुपर्ब.. हसून हसून लोळतोय अक्षरशः!
उत्तर द्याहटवाधन्यवाद अखिलेश :)
उत्तर द्याहटवा